Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सोमनाथ येथे सुखदेव चौथाले यांच्या झाडीचा पोहा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

सोमनाथ येथे सुखदेव चौथाले यांच्या झाडीचा पोहा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

मूल प्रतिनिधी

झाडीबोली साहित्य मंडळ मुल  शाखेचे अध्यक्ष कवी सुखदेव चौथाले यांच्या झाडीचा पोहा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोमनाथ येथील निसर्गरम्य परिसरात संपन्न झाले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  साहित्यिक  ग्रामगीताचार्य  बंडोपंत बोढेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवी हरिभाऊ तेलंग यांचे हस्ते झाले. तर मुलच्या नगराध्यक्ष तथा कवयित्री सौ.  रत्नमाला भोयर, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र  
जेणेकर, जुनासुर्ला‌ चे सरपंच रंजीत समर्थ , मूल पं. स. चे माजी सभापती दशरथ वाकुडकर, डॉ. विठ्ठल चौथाले, कवी सुखदेव चौथाले, सौ. प्रभाताई चौथाले, सौ. शशिकला गावतुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव चौथाले यांनी केले. उपस्थित अतिथींनी समयोचित विचार व्यक्त करून चौथाले यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.अर्धशतकी कविता असलेल्या  झाडीचा पोहा या काव्यसंग्रहातून कवी चौथाले यांनी झाडीबोली शब्दांसह झाडीपट्टी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले असल्याचे याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी मत व्यक्त केले. सुखदेव चौथाले यांची दिव्यांग क्षेत्रातील  शैक्षणिक सेवा कौतुकास्पद असल्याचे हरिभाऊ तेलंग यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभारप्रदर्शन नामदेवराव पिजदुरकर  गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  गणेश चौथाले, गुरुदेव बोदलकर , राघवेंद्र  वासेकर, अमित राऊत, कु. कुमुदिनी भोयर,
विनोद पिंपळकर,सुरेखा पिंपळकर, अभिलाष डोनीवार,
आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात  वैनगंगा बहुउद्देशीय प्रतिष्ठान मुल च्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा   कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यात  सीताराम पाटील मुसळे कोहपरा,गणेश  मांडवकर,नामदेव पिजदुरकर, डाॅ. विठ्ठल चौथाले, 
चामोर्शी, प्रा.किसन वासाडे मुल, सारीका  वासेकर मुल, प्रा.संतोष कावरे चंद्रपुर,कवी लक्ष्मण खोब्रागडे जुनासूर्ला,  राघवेंद्र वासेकर मुल ,अनिल गांगरेडीवार मुल , सुहानी पिंपळकर मुल ,अजय वैरागडे आदींचा सन्मान   करण्यात आला. झाडी गौरव गीतांचे गायन कु. सुहानी यांनी केले.

Post a Comment

0 Comments