Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विधी महाविद्यालय चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांना मूलच्या शिक्षकांनी दिले योगाचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विधी महाविद्यालय चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांना मूलच्या शिक्षकांनी दिले योगाचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मूल प्रतिनिधी

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर द्वारा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन मूल तालुक्यांतील चितेगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. 

आयोजित  राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये योग आसन, प्राणायाम मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुलोम विलोम, कपाल भारती, भास्त्रिका प्राणायाम, सूर्यनमस्कार असे विविध प्राणायाम घेण्यात आले. विधी महाविद्यायाच्या  विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. योग शिबिराला  मूल येथील योग शिक्षक सुरेश खियानी, योग शिक्षक दिलीप पोकळे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हा भारत सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने चालवलेला एक सक्रिय कार्यक्रम आहे जो देशाच्या तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आहे.

साक्षरतेशी संबंधित काम, पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, आपत्कालीन किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्रस्त लोकांना मदत इत्यादी विद्यार्थी जीवनापासून सामाजिक कार्यात गुंतून राहून त्यांच्यामध्ये समाजसेवा किंवा राष्ट्रीय सेवेचे गुण विकसित होतात.

Post a Comment

0 Comments