Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शिव किराणा बाजार तर्फे संतूर रांगोळी स्पर्धा संपन्न

शिव किराणा बाजार तर्फे संतूर रांगोळी स्पर्धा संपन्न

मूल प्रतिनिधी

मूल येथील शिव किराणा येथे संक्रांति निमित्त महिलांकरिता निशुल्क संतूर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये 18 वर्षावरील युवती आणि महिलांचा सहभाग घेण्यात आला होता. स्पर्धेत ग्रामीण भागातील आणि शहरातील महिलांनी स्पर्धेकरिता गर्दी केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मूल येथील माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रीती चिंमड्यालवार, अनघा चिंतावार, संजय चिंतावार, राजेश चिंतलवार, कंपनीचे सेल्स ऑफिसर युगांत गोंगले आदी उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेचे प्रथम बक्षीस प्रियंका गडेवार यांनी मिळविले. द्वितीय काजल जेनेकर, तृतीय रवीना धोटे यांनी क्रमांक प्राप्त केले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिव किराणा येथील कर्मचारी आणि संतूर विप्रो प्रायव्हेट कंपनीचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments