Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दुचाकी चोरट्यास अटक, मूल पोलिसांची कारवाई

दुचाकी चोरट्यास अटक, मूल पोलिसांची कारवाई

मूल प्रतिनिधी

दि. १२/०१/२०२३ रोजी फिर्यादी रा मुल यांनी पोस्टे मुल येथे येवून रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची बजाज पल्सर क्र. MH34-BN-8912 किं अं ४०,०००/- रू ही दि १०/०१/२०२३ रोजी त्याचे घरासमोर उभी करून ठेवली असता सायंकाळी ०६:०० वा दरम्यान त्याचा ट्रक चालक सचिन तिवाडे रा उश्राळा ता मुल याने चोरून नेल्याचा संशय आहे अशी तोंडी रीपोर्ट दिल्याने पो स्टे मुल येथे दि.१२/०१/२३ रोजी अप क्र. १९/२३ कलम ३७९ भादवि नोंद आहे.

पो स्टे मुलचे पोउपनि राठोड हे सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना आज दि.१२/०१/२३ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की सदर संशयीत सचिन तिवाडे हा गोंडपिपरीकडे जात आहे अशा माहीतीवरून तपास पथकातील अधिकारी कर्मचारी हे पो स्टे गोंडपिपरी परीसरात गेले असता मौजा आक्सापूर येथे सचिन प्रभाकर तिवाडे वय ३१ वर्ष रा उश्राळा हा गुन्हयातील चोरीची मो सा बजाज पल्सर क MH34-BN-8912 किं.अं ४०,०००/- रू सह मिळून आल्याने मौजा आक्सापूर पो स्टे गोंडपिपरी येथे जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी व जप्त मोटर सायकल ताब्यात घेवून पो स्टे मुल येथे आले व सदर आरोपीस अटक केली.
सदरची कार्यवाही मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लिकार्जुन इंगळे सा व पो.नि. श्री सतीशसिंह राजपूत सा यांचे मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी / २४९७, पोअं श्रावण / २६८६, संजय/ १५९१ पो स्टे मुल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments