Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी,चिमढा येथील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी,चिमढा येथील घटना

मूल प्रतिनिधी

शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला.त्यात एक महिला जखमी झाली.ही घटना तालुक्यातील चिमढा येथे रविवारी दुपारी घडली.जखमी महिलेचे नाव मायाबाई लोनबले वय 60 वर्षे असे आहे.नेहमी प्रमाणे मायाबाई आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या.गावाला लागून असलेल्या अर्ध्या एकर शेतीमध्ये त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.पतीच्या निधनानंतर त्याच शेतीकडे लक्ष देतात.दोन मुलींचे सुदधा लग्न झाले.रविवारी दुपारी शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला.त्यात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली.मायाबाईला बाजूच्या शेतातील लोकांनी तातडीने मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले.त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहे.वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतक-यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे.अशा वातावरणात शेती करायची कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे वाघाचा धुमाकूळ आणि दुसरीकडे रानडुकरांचा हैदोस यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments