Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बालविकास प्राथमिक शाळेत खरी कमाई अंतर्गत आनंद मेळावा संपन्न


बालविकास प्राथमिक शाळेत खरी कमाई अंतर्गत आनंद मेळावा संपन्न

मूल प्रतिनिधी


समाज सुधारक शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बालविकास प्राथमिक शाळा, मूल येथे दिनांक 16.12.2022 रोज शुक्रवारला आमची खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता अनिल बुटे मॅडम, तसेच उपस्थित पालक वर्ग,प्रतिष्ठित नागरिक  यांच्या शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विजय वैरागडवार सर,विनोद भाऊ आत्राम, कावळे ताई, लेनगुरे ताई, प्रणाली ताई येनगणंटीवार,विनोदभाऊ कावळे,विवेक भाऊ मांदाडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून
उपस्थिती दर्शविली. 

या आनंद मेळाव्यात इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यानी अतिशय रुचकर पदार्थ तयार करून आणले होते. यात शेझवान राइस,फ्रेंच प्राईस, मंचुरियन,सँडविच,रवा बेसन टोस्ट, आलू टोस्ट,पावभाजी,पाणी पुरी,शेवपुरी, मोमोज,वडा सांबार इत्यादी पदार्थांची मेजवानी होती.या आनंद मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दिव्यांग विद्यार्थिनी विधी सोनवणे हिने आलू भजा,तर नेहा निकुरे हिने ढोकळा हा पदार्थ तयार करून सर्वांचे लक्ष वेधले. या आनंद मेळाव्यात इयत्ता सातवी आणि आठवीच्या एकूण 79 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात विविध चवदार पदार्थांचे  एकूण 19 स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी,त्यांच्या पालकांनी तसेच परिसरातील आणि शहरातील व्यक्तींनी सुद्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.

या आनंद मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता अनिल बुटे मॅडम,कार्यरत सर्व शिक्षक तसेच सर्व पालक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.  अश्या प्रकारे भरगच्च प्रतिसादात आमची खरी कमाई 
अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments