Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सायकल चोरट्यास अटक, मूल कोचिंग क्लासेस येथील घटना

सायकल चोरट्यास अटक, मूल कोचिंग क्लासेस येथील घटना

मूल प्रतिनिधी

कोचिंग मध्ये गेलेल्या विद्यार्थिनींची AVON कंपनीची सायकल चोरणाऱ्या आरोपीला मूल पोलिसांनी अटक केली.

28 डिसेंम्बरला नवभारत शाळेच्या मागे असलेल्या चौधरी यांचे कोचिंग क्लासेस मध्ये गेलेल्या विद्यार्थिनींची सायकल अज्ञाताने चोरली होती, याबाबत विजय सोनूले यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

सायकल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना 29 डिसेंम्बरला पुन्हा एकाच्या घरासमोरून अज्ञाताने सायकल चोरत ती सायकल सोबत घेत चंद्रपूर च्या दिशेने घेऊन जात होता, याबाबत मूल पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोउपनी राठोड यांनी चमुसह चंद्रपूरच्या मार्गावर निघाले असता त्यांनी आदर्शखेडा मूल येथील विलास शेंडे याला ताब्यात घेण्यात आले. 

आरोपी शेंडे याची कसून चौकशी केली असता पहिल्या गुन्ह्यातील सायकल ही मूल तहसील कार्यालयजवळ लपवून ठेवली असल्याचे सांगितले, मूल पोलिसांनी 2 सायकली आरोपिकडून जप्त करीत 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही ही उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे व पो. नि. सतीशसिंह राजपूत सा यांचे मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, संजय जुगनाके, श्रावण कुत्तरमारे यांनी केली असुन तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments