Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वर्धा येथे विभागीय कुस्ती स्पर्धेत मूल च्या विद्यार्थ्यांची भरारी झेप,मूल शहरातील कुस्ती स्पर्धेतले पहिले खेळाडू

वर्धा येथे विभागीय कुस्ती स्पर्धेत मूल च्या विद्यार्थ्यांची भरारी झेप,मूल शहरातील कुस्ती स्पर्धेतले पहिले खेळाडू  

मूल प्रतिनीधी
 

वर्धा येथे नुकत्याच झालेल्या रामदास तडस इनडोअर स्टेडियम देवडी येथील विभागीय कुस्ती स्पर्धेत मूल च्या पुर्वा कामनपल्लिवार आणि मोहित चौखुंडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहे.     

मूल मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून तालुका क्रिडा संकुल येथे विद्यार्थीचे कुस्ती प्रशिक्षण सुरू असून त्यात तालुका क्रिडा कुस्ती प्रशिक्षक आकाश चौधरी,करण कोसरे यांनी अथक परिश्रम करीत विद्यार्थ्यां कडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कुस्ती चे प्रशिक्षण देत आहे. त्यांना तालुका क्रिडा अधिकारी रंगारी यांचे सहकार्य लाभले आहे.  

खेळाडूंनी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत 11 सुवर्ण तर 4 रौप्य (सिल्वर) अशी एकूण 15 पदके मिळवून वर्धा येथे झालेल्या विभागीय स्तरिय स्पर्धेत 11 खेळाडूनी आपापल्या वजन गटात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये 39 कि.चतुर्थी धाडगे, 40 कि.समिक्षा शेंडे, 43 कि. सलोनी भंडारे, 46कि. प्रगती शेंडे, 49कि.पूर्वा कामनपल्लीवार, 50कि. वंशिका चिताडे,57कि. रिया चौधरी, 61कि.क्षितिजा कामडे, 41कि.क्रिष्णा शेंडे, 52कि. हर्ष मांदाडे, 71कि.मोहित चौखुंडे यांचा समावेश होता. 

सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यात दोन खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावला. या खेळाडूंनी अवघ्या तीन महिन्यांत आपले व आपल्या शाळेचे, मुल तालुक्याचे विभाग स्तरावर कुस्ती खेळात नाव रोवले आहे. मुल मध्ये या वर्षी असे कुस्ती खेळाडू घडणारे हे पहिले खेळाडू आहेत.  प्रथम वर्षीच स्वामी विवेकानंद शाळेतील व नव भारत शाळेतील विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावर भरारी झेप घेतली आहे.

Post a Comment

0 Comments