Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे फॅमिली फंडे साजरा, विविध कार्यक्रमांची मेजवानी

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे फॅमिली फंडे साजरा, विविध कार्यक्रमांची मेजवानी

मूल प्रतिनिधी


मूल येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे SLAMFS The Educational Events अंतर्गत सात दिवसीय कार्यक्रमासाठी दिनांक 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत विज्ञान प्रदर्शनी व इतर विषयांचे प्रदर्शनी व क्रीडा मोहत्सवाचे उदघाटन करण्यात आले तसेच विद्यालयात तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 16 डिसेंबर 2022 रोज शुक्रवारला विद्यार्थी तर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आणि या सात दिवसीय शैक्षणिक कार्यक्रमाची सांगता म्हणून आज दिनांक 17 डिसेंबर 2022 रोज शनिवार ला विद्यालयात फॅमिली फंडे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री गजानन नागापुरे माजी मुख्याध्यापक नवभारत विद्यालय मूल तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत मणियार, हेमंत सुपनेर व बल्लारपूर पब्लिक स्कूल विद्यालयाचे प्राचार्य विनोद बोलीवार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये स्पोर्ट यू टीम हेंद्राबाद यांच्या कडून पालक व विद्यार्थी करिता विविध शैक्षणिक खेळाचे आयोजन करण्यात आले व पालकांनी सुद्धा खूप मोठया संख्यानी प्रतिसाद दिला या कार्यक्रमात पालकांनासाठी गीत गायन स्पर्धा, व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली या कार्यकामाचा आस्वाद विद्यार्थीनी व पालकांनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जायस्वाल व सौं दुर्गा कोटगले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्तावना विद्यालयाचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु शिरीषा मॅडपल्लीवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाली.

Post a Comment

0 Comments