Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मंत्री चंद्रकांत पाटील यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, जोडे मारून केला निषेध

मंत्री चंद्रकांत पाटील यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, जोडे मारून केला निषेध

मूल प्रतिनीधी

पिंपरी चिंचवड येथील आयोजित सभेत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केले. त्या व्यक्ताव्याच्या विरोधात मुल तालुका शिव शाहू फले आंबेडकर कर्मवीर विचार मंच मूल च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पाटील हे पैठण येथील सभेत महाराष्ट्राचे दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी त्या काळामध्ये लोकांना भीक मागून शाळा चालवीत होते असे अपमानास्पद व्यक्तव करुन या महापुरुषांचा अपमान केलेला आहे. त्या विरोधात मुल तालुक्यातील  शीव फुले, शाहू, आंबेडकर कर्मवीर विचारमंच मुल येथे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली
सदर रॅली गांधी चौक येथे येवून मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार मुल यांचे मार्फतीने राष्ट्रपती तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपदावरुन पाय उतार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व डेविड खोब्रागडे यांनी केले. यावेळी डॉ.समीर कदम, श्री गजानन चौधरी ,प्राध्यापक विजय लोणबले, श्री डेविड खोब्रागडे सौ ललिता फुलझले , श्री राकेश रत्नावार , श्री भास्कर खोब्रागडे,  गुरु चौधरी सर , रुपेश निमसरकार ,सौ विजयाताई रामटेके,आदी मान्यवरांनी मोर्चास मार्गदर्शन केले.
  
सदर मोर्चा यशस्वी करण्यास श्री नंदू बारस्कर श्री प्रशांत गट्टूवार श्री राकेश  मोहुर्ले श्री ईश्वर लोणबले  श्री सुरेश फुलझले श्री सुजित खोब्रागडे श्री पुरुषोत्तम जी साखरे श्री मनोज मोहर्ले श्री गुरु भाऊ गुरनुले श्री किसन वासाळे सर, कृष्णा गोवरधन सर, अनिल सोनुले,  पाटील जी, श्री दुशांत महाडोळे श्री कुमार दुधे श्री श्याम उराडे श्री शैलेश वनकर श्री आकाश दहिवले श्री दुर्गे सर सौ बबीता भडके सौ उषा दुर्गे श्री दत्तू मेश्राम, किसन गुरूनुले, अनुप आदे, ज्ञानेश्वर वाघमारे ,  राजेंद्र वाढई, यांनी अथक प्रयत्न केले.
 
सदर रॅली ला शेकडोच्या संख्येने बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुरेश भाऊ फूलझेले व ओमदेव मोहूर्ले व आभार प्रदर्शन नंदू भाऊ बारस्कर यांनी केले.

Post a Comment

0 Comments