Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भेजगाव येथे आरोग्य मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

भेजगाव येथे आरोग्य मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ 

मूल प्रतिनिधी
 

राष्ट्रीय आरोग्य अभियान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भेजगाव येथे करण्यात आले होते.

या आरोग्य मेळाव्याचे अध्यक्षस्थानी भेजगाव ग्रामपंचायत चे सरपंच अखिल गांगरेड्डीवार होते. तर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अचल मेश्राम होते. प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगारी, जिल्हा परिषद शाळा भेजगावचे मुख्याध्यापक निमगडे, शिक्षक कोल्हे, भेजगावचे  समुदाय आरोग्य अधिकारी कल्याणी पाल, गोवर्धन, शिरभये, पाऊल झगडे, सोनुले, आशा वर्कर आदी उपस्थित होते.

या आरोग्य मेळाव्यात शुगर, बीपी तपासण्यात आली. क्षयरोग कुष्ठरोग व गरोदर माता तपासणी, कान, नाक,घसा तपासणी,रक्त, फ्लोरोसिस आदी आजारांची तपासणी करुन निदान व औषधोपचार करण्यात आले.
भेजगाव येथील आणि  परिसरातील नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा आवर्जून लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments