Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात जागतिक एड्स दिन संपन्न,रॅली काढुन केली जनजागृती

मूल शहरात जागतिक एड्स दिन संपन्न,रॅली काढुन केली जनजागृती

मूल प्रतिनिधी

आयसीटीसी (ICTC),संकल्प बहुऊदेशीय ग्राम विकास संस्था आणि देवनील नर्सिंग कॉलेज आकापूर अंतर्गत मूल शहरात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.सोबतच मूल शहरात रॅली काढण्यात आली.

रॅलीचे उदघाट्न उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भागवत यांचे हस्ते झाले. रॅलीची सुरूवात उपजिल्हा रुग्णालया पासुन करण्यात आली.बस स्थानक परीसरात पोहचुन जनजागृती करीत एड्स दिनाची शपथ घेण्यात आली. बस स्थानक ते गांधी चौक मार्गे टीएमओ ऑफिस मूल येथे पोहचुन एड्स विषयावर विधार्थांनी पथनाट्य सादर केले. त्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी  आयसीटीसी समुपदेशक मीना नंदनवार,टेक्निशन मयुरी कोलप्याकवार, संकल्प बहुऊदेशीय ग्राम विकास संस्था प्रकल्प चंद्रपूरचे लिंक वर्कर प्रशांत कवाडे, सिमा निमगडे, मंजुषा आलेवार, देवनील नर्सिंग कॉलेजच्या प्रा.भावना टेकाम, प्रा.प्रज्ञा चुनारकर, प्रा.मिनू रामटेके,प्रा.स्नेहल कोसरे, प्रा.श्रीकांत आत्राम आणि देवनील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments