Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

थेट सरपंचाचे निवडणूकीची मूल तालुक्यात रणधुमाळी

थेट सरपंचाचे निवडणूकीची मूल तालुक्यात रणधुमाळी

मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यात सात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, 7 गावचे सरपंच पदासाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत, तर 57 सदस्य पदासाठी 105 उमेदवार आपले  भाग्य अजमावित आहेत. येत्या 18 डिसेंबर रोजी बेंबाळ,गडिसुर्ला,बोंडाळा खुर्द,चक दुगाळा,बाबराळा,आकापूर,उश्राळा या सात ग्राम पंचायतीची निवडणूक असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यांचा अखेरची वेळ संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली आहे. अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणा—या 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर, 18 उमेदवारांची सदस्य पदाचे नामांकन परत घेतल्यांचे ​लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याकरिता उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून काल 7 डिसेंबर ला उमेदवारांना चिन्हे मिळाली आहे. यामध्ये निवडणुकीत 7 ग्रामपंचायतीची ची निवडणूक होत असल्याने एकूण 7 सरपंच निवडून द्यावयाचे आहेत, त्याकरिता 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर एकूण 57 सदस्य निवडून द्यावयाचे असून 105 सदस्य निवडणुकीकरिता अर्ज दाखल केले आहेत.  सदस्या करिता एकूण 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर सरपंच करिता 7 उमेदवार अर्ज मागे घेतले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच आणि सदस्य निवडून येण्याकरिता पॅनल स्वतःची शक्ती आणि युक्ती लावीत आहेत.  मुख्य  पक्ष असलेल्या समर्पित खरी लढत होत असली तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत आता युवकांचा समावेश पुढे येत असल्याने दोन्ही मुख्य पक्षाला हादरा बसला आहे. अनेक ग्रामपंचायतीत युवक एकत्र येत स्वतःची पॅनल उभी करून स्वतःची ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नविन युवकांना मतदार प्रतिसादही देत असल्याचे चित्र गावात दिसून येते. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनी आपली ताकद दाखवीत स्वतःचे पॅनल उभी करून ग्रामपंचायतीत आपला झेंडा रोवला आहे, हे विशेष.

Post a Comment

0 Comments