Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्वस्त आणि मस्त राहण्याकरिता योग नृत्य प्रशिक्षण शिबिर

स्वस्त आणि मस्त राहण्याकरिता योग नृत्य प्रशिक्षण शिबिर

मूल प्रतिनिधी

योग नृत्य परिवार चंद्रपूरच्या सहकार्याने श्री मा दुर्गा मंदिर सेवा समिती मूल च्या वतीने निशुल्क योग नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मूल येथे करण्यात आले आहे.

शिबिर दिनांक 19 नोव्हेंबर पासून सकाळी 5 वाजून 30 मिनिट ते 6 वाजून 30 मिनिट वाजेपर्यंत राहणार आहे. योग नृत्य प्रशिक्षण शिबिराचे स्थळ श्री मा दुर्गा मंदिर मूल च्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे.

योग नृत्य परिवार चे संस्थापक गोपालजी मुंदडा यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  शिबिराचा लाभ मूलच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने घेऊन सर्वदृष्ट्या सुदृढ राहण्याचे आवाहन श्री मा दुर्गा मंदिर सेवा समिती मूलचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments