Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे बालकदिन उत्साहात साजरा

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे बालकदिन उत्साहात साजरा

मूल प्रतिनिधी

बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विनोद बोलीवर, प्रमुख पाहुणे दुर्गा मॅडम, तोषी मॅडम तसेच विद्यार्थ्याच्या मनात बालक दिनाच्या महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्याचे लाडके चाचा नेहरू यांच्या वेशभूषेत आशिष बावणे हे होते. विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य सोनुले व विद्यार्थिनी प्रतिनिधी संस्कृती कटकमवार यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थाचे सत्कार करण्यात आले. प्रथमसत्र परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थाचे अभिनंदन करण्यात आले.

प्राचार्य विनोद बोलीवर यांनी बालक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थांना बालकांचे महत्त्व व त्यांचे अस्थित्व ठीकवून ठेवण्याचे आव्हान व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी आनंद मिळावा म्हणून मुल येथील प्रसिद्ध पंडित दिनादयाल इको पार्क मुल येथे विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कला तसेच Sport - U द्वारे खेळाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुहिना सय्यद यांनी केले. आभार प्रदर्शन रजनी मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.

Post a Comment

0 Comments