Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भेजगाव येथे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न, समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचा पुढाकार

भेजगाव येथे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न, समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचा पुढाकार

मूल प्रतिनीधी

मूल तालुक्यातील भेजगाव येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शरचंद्र पवार विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन मुंबई, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तथा सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगाव व पोलीस पाटील संघटना मुल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटक  सेवानिवृत्त तहसीलदार भगवान वाढई, तर अध्यक्ष पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल ठिकरे, प्रमुख अतिथी सक्षम संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर, समता फाउंडेशन मुंबईचे जिल्हा समन्वयक राहुल मोगरकर, टोलेवाही येथील पोलीस पाटील संगीता चल्लावार,  पुंडलिक जवादे,  जमनादास गोंगले, माला वाळके, प्रतिभा लहामगे, शंकर शेंडे, देविदास गेडाम आदी मंचावर उपस्थित होते.
शिबिरामध्ये 130 नागरिकांनी सहभाग नोंदविला. यातील जवळपास 60 रुग्णांची शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत केली जाणार आहे. शिबिरामध्ये मूल  उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्रचिकित्सा अधिकारी व्हि. ए. गुळधे यांनी रुग्णांची तपासणी केली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची 12 नोव्हेबरला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शस्त्रक्रिया केली जाणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची ने आण राहण्याची जेवनाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments