Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पर्यावरण पुरक पोर्टल पत्रकारीता

डिजीटल मिडीया असोसिएशन (चंद्रपूर—गडचिरोली जिल्हा) व डिजिटल मिडीया पब्लिशर अॅंड न्यूज पोर्टल ग्रीवेंस कौंसील आॅफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 रोजी चितेगांव येथे न्यूज पोर्टल संपादकांचे अधिवेशन होत आहे. या निमीत्ताने लेख पर्यावरण पुरक पोर्टल पत्रकारीता


अलिकडे जगात पत्रकारीतेचे नवे माध्यम सुरू झाले, अल्पावधीतच लोकप्रिय झाले आणि आता बर्यापैकी विश्वासार्ह देखिल होत आहे. प्रत्येकाच्या हातात, क्षणोक्षणी बातम्या आहेत, क्षणा—क्षणाच्या बातम्या आहेत, जगाच्या कानाकोपर्यापासून विश्वांच्या अंतरंगातीलही बातम्या बोटाच्या स्पर्शातून नजरेत तत्काळ आपल्या नजरेत आणण्याचे सामर्थ्य या नव्या माध्यमात अर्थातच न्यूज पोर्टलमध्ये आहे.
पोर्टल पत्रकारीतेबद्दल अनेक वाद—विवाद आहेत, शंका—कुशंका आहे, अनेकांच्या मते विश्वासार्हतेचाही प्रश्न आहे. मात्र हे माध्यम आता जगमान्य, लोकमान्य, समाजमान्य झाले असून, शासनमान्यही झाले असल्यांने, पोर्टल पत्रकारीता बाजूला ठेवून 'केवळ' पारंपारिक माध्यमाद्वारचे समाजाचे प्रश्न मांडण्यांचे दिवस आता जवळपास संपुष्टात येत आहे किंबहुना ते आलेही आहे.
पोर्टल पत्रकारीतेने अनेक क्षेत्रात बदल घडवून आणले आहे. पोर्टल पत्रकारीता ही पर्यावरण पुरक असल्यांने, नियमीत पारंपारिक पत्रकारीतेच्या तुलनेत पोर्टल पत्रकारीता अधिक विकसीत होणे गरजेचे आहे.
पारंपारीक वर्तमानत्र हे लाकुड, बांबू पासून तयार झालेल्या कागदावर छापून प्रकाशीत केले जाते. यासाठी दररोज अब्जो टन कागदाचा वापर यासाठी केला जातो. याचा अर्थ एवढा कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल कटाई केली जाते. यातून जे होते पर्यावरणाची हाणीच होत असते. U.S. Environmental Protection Agency ने प्रकाशीत केलेल्या एका अहवालानुसार वर्षात 300 मिलीयन टन कागद, वर्तमानत्राकरीता लागत असतो. हा आकडा आपल्या कल्पनेपलिकडचा आहे. याचाच अर्थ कागदावर छपाई होणारे वर्तमानत्राची संख्या जर वाढत राहीली तर, पर्यावरणाचा प्रश्नही आणखी गडद होण्यांची भिती आहे.
पोर्टल पत्रकारीतेने पारंपारिक छपाईच्या ऐवजी आपल्या मोबाईल मधून डिजीटल माध्ययातून बातम्या आपल्या वाचकांपर्यंत पोहविण्यांचे कार्य करीत आहे. वाचकांना विश्वासार्ह बातमी हवी असते, ती गरज पोर्टल पत्रकारीतेतून सहज भागविली जाते. कुणाला या बातमीची प्रिंट कॉपी आवश्यक असेलच तर, त्यांना तशी प्रिंटही काढता येते. वर्तमानपत्र प्रत्येकांसाठी असते, मात्र वर्तमानपत्रातील सर्व बातम्या या सर्वांसाठीच नसते. अशा वेळी ज्यांना ज्या बातमीची गरज आहे, नेमकी तीच बातमी वाच​ण्यांची, संग्रही ठेवण्यांची सुविधा पोर्टल पत्रकारीतेत आहे. या पत्रकारीतेमुळे मोठ्या प्रमाणावर वर्तमानत्रासाठी कागद वाचविल्या जात असल्यांने, पोर्टल पत्रकारीता ही पर्यावरण पुरक पत्रकारीता आहे, आणि ती वाढण्यांची गरज आहे.

विजय सिध्दावार
9422910167

Post a Comment

0 Comments