Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आदिवासी वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात संपन्न

आदिवासी वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात संपन्न 

मूल प्रतिनिधी

मूल येथील शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान प्रास्ताविकेचे यावेळी वाचन करण्यात आले.

आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर अंतर्गत शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह मुल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मागदर्शक म्हणुन वसतिगृहाचे गृहपाल गजेंद्र प्रधान, कर्मचारी रत्ना पारखी, संदिप पारचे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी संविधानाविषयी माहिती विशद केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा संविधान दिनाबाबत भाषण दिले. यावेळी वस्तिगृहातील विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments