Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे यांचा सत्कार

राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे यांचा सत्कार

मूल प्रतिनिधी

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे 18 वे राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलन आदर्श गाव घाटकूळ ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर  येते दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2022 ला दोन दिवसीय संमेलन आयोजित केलेला आहे. सदर संमेलनाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, सर्व स्थानिक मंडळ आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशिष्ट सेवा पुरस्कार वितरण, परिसंवाद, सप्तखंजेरी युवा कीर्तन कार इंजी. उदयपाल महाराज वणिकर यांचे राष्ट्रीय कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यानपाठ निसर्गोपचार व योग प्राणायाम मार्गदर्शन, अनुभव कथन, कवी संमेलन आणि समारोप असे संमेलनाचे एकंदरीत स्वरूप असणार आहे. 
18 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नामदेव कोकोडे ( ब्रम्हपुरी ) यांचा झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन युवा कादंबरीकार धनंजय पोटे आणि नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक प्रमोद येरने यांनी डॉ. कोकिडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. कोकोडे यांच्या सौभाग्यवती डॉ. माधुरी नामदेव कोकोडे उपस्थित होत्या. मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ.कोकोडे एन. एच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांनी आजवर  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुरूप केलेले शैक्षनीक, विद्यापीठ स्तरावरील केलेले कार्य उल्लखनीय आहे.
कर्मयोगी संत गीताचार्य श्री तुकाराम दादा यांनी सूरू केलेल्या भूवैकुठ अड्याल टेकडी च्या सेवाकार्यात डॉ कोकोडे यांचे योगदान आहे. तसेच 11 पुस्तके डॉ कोकोडे यांच्या नावाने प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे एकुण 156 संशोधन पेपर प्रकाशित डॉ कोकोडे यांनी केलेले आहे. अकॅडमी कौन्सिल, मॅनेजमेंट, सिनेट सदस्य,बीसीडी डायरेक्टर, डीन, आर.आर. सी या महत्वाच्या पदावर डॉ कोकोडे हे कार्य केलेले आहे.

Post a Comment

0 Comments