Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आदर्श ग्राम कोसंबीला भेट, विकास कामांच्या पाहणी सोबतच साधला ग्रामस्थांशी संवाद

जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आदर्श ग्राम कोसंबीला भेट, विकास कामांच्या पाहणी सोबतच साधला ग्रामस्थांशी संवाद

मूल  प्रतिनिधी
 

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाँन्सन यांनी नुकतीच मूल पंचायत समिती ला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. दरम्यान  पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कोसंबी येथे सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान गावातील विकास कामाची पाहणी केली व अंगणवाडीतील महीला, वाचनालयातील विद्यार्थी  आणि सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध उपक्रमाविषयी चर्चा केली. तसेच सोमनाथ गोसदन, मारोडा तलाव सौंदर्यीकरण बाबत चर्चा केली व गांडूळ खत प्रकल्प चे उद्घाटन केले. या प्रसंगी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत आणि कोसंबी चे सरपंच रवींद्र किसन कामडी, तसेच विस्तार अधिकारी संजय पुप्पलवार, जीवन प्रधान, सुनिल कारडवार,  उपविभागीय अभियंता गोंगले,  बिसेन,   भाग शिक्षणाधिकारी वैभव खांडरे , सतिश वनकर, प्रज्ञामित्र नगराळे ,बोरकर, ग्रा.पं चे सचिव सुरज आकनपल्लीवार, उपसरपंच सारिका गेडाम, सदस्य चंदा कामडी, अरुणा वाढई, रोषनी मोहुर्ले, चौधरी आणि कर्मचारी वृंद, महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी चे अध्यक्ष वेदिका विवेक सोनुले, सचिव आणि सदस्य गण, सर्व महीला बचत गट, सर्व पुरुष बचत गट,पशु सखी,आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सर्व महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले महाराज, आणि सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील अर्चना मोहुलै, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, ,निषाताई सोनुले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी चौधरी, उमाजी पेंदाम, नारायण गिरडकर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी , पालक, ग्राम पंचायत कमेटी, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, नवयुवकवायामशाळा,आंगनवाड़ी सेविका,आंगनवाड़ी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कृषी मित्र, संगणक परिचारक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक मंडळ, युवती मंडळ, आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments