Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नोटबंदी कायद्याविरुद्ध काँग्रेसने पाळला काळा दिवस, काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्व

नोटबंदी कायद्याविरुद्ध काँग्रेसने पाळला काळा दिवस, काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्व

मूल प्रतिनिधी

केंद्रातील भाजपचे मोदी सरकार 6 नोव्हेंबर रोजी नोटा बंदीचा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशातली अर्थव्यवस्था कोलमडली त्यामुळे उद्योग धंदे गेले लाखो तरुण बेरोजगार झाले करीता 6 नोव्हेंबर हा दिवस देशात काळा दिवस पाळून मुल तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस तर्फे काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देत काळा दिवस पाळला. मोदी सरकारच्या दडपशाहीने देशाची अर्थ व्यवस्था ढासळली असुन लाखो तरुण बेरोजगार झालेत. हा तरुणांवर अन्याय असल्याने त्याचा निषेध करण्यात आला. काळ्या फिती लावुन मोदी सरकार हाय हाय म्हणत जाहीर निषेध केला.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी न.प. उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर घडसे, नवनियुक्त तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेडीवार शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, ज्येष्ठ माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, माजी संचालक डॉ. पद्माकर नगुरे, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, ग्रामीण युवा नेते प्रशांत उराडे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, कैलाश चलाख, अतुल गोवर्धन, मनोज दामल्लीवर यांचे सह शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments