Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्वामी विवेकानंद शाळा आणि तालुका विधी सेवा समिती, मूल तर्फे संविधान दिन संपन्न

स्वामी विवेकानंद शाळा आणि तालुका विधी सेवा समिती, मूल तर्फे संविधान दिन संपन्न

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि तालुका विधी सेवा समिती मूलतर्फे शाळेच्या सभागृहात संविधान दिन उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शोभाताई फडणवीस तर मुख्य अतिथी मूल न्यायालयाचे न्यायाधीश बी.के.अहिर होते. प्रमुख पाहुणे एड. प्रणव वैरागडे, एड. शेख एड. अनंता बल्लेवार, शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे आदी पाहुणे उपस्थित होते.

जगात सर्वात मोठी तसेच श्रेष्ठ लिखित राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख होतो. भारतीय संविधान सर्वांना समानता, न्याय, बंधुत्वाची शिकवण देते. आपला देश संविधानावर चालतो. अशी विस्तृत माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाषणात दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी सुरमवार, डोहने या विद्यार्थिनींनी  संविधानावर विस्तृत भाषण केली.

भाषण करणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक गुरनुले तर आभार खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments