Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे संविधान दिनी प्रास्ताविकेचे वाचन

मूल येथे संविधान दिनी प्रास्ताविकेचे वाचन 

मूल प्रतिनिधी
 

जगात सर्वात मोठी तसेच श्रेष्ठ लिखित राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख होतो. भारतीय संविधान सर्वांना समानता, न्याय, बंधुत्वाची शिकवण देते. मुल येथील प्रशासकिय भवन परिसरातील संविधान चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदु रणदिवे, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, जेष्ठ पत्रकार विजय सिद्धावार, जेष्ठ नागरिक मोतीराम वाघमारे यांचे उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी जोशना गोहणे, सचिन वाकडे, गौरव शामकुळे, रवी बरडे, शुभम मानकर, अमित राऊत, अनिकेत बुग्गावार, स्नेहल गेडाम, संजय मोहुर्ले यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments