Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची वन विभागाचे मुख्य सचिवासोबत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची वन विभागाचे मुख्य सचिवासोबत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक

मूल प्रतिनिधी

ताडोबा  बफर झोन चंद्रपूर येथील  कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे मुख्य सचिव वेणू गोपाल रेडडी व शोभाताई फडणवीस, माजी  मंत्री यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये शोभाताई यांनी शेतकऱ्यांचा अडचणीला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या. वाघ व मनुष्य संघर्ष यामध्ये शेतकरी वाघाच्या दहशतीमुळे आपली शेती करीत नाही शेतकऱ्यांनी आपले जीवन जगायचे कसे? दुसरे रानडुकरांची संख्या ,शेतीचे होणारे नुकसान. उभ्या पिकाची नासाडी करून रानडुक्कर शेतात येतात व पिकांची  नुकसान करतात .आणि वन विभागाकडून थातूरमातूर नुकसान भरपाई देण्यात येते .ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची थट्टा करणारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देण्यात यावी व वनविभागाच्या नुकसान भरपाई चे निकष बदलून शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यानुसार  वनविभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मान . शोभाताई यांनी मुख्य सचिव व पीसीसीएफ नागपूर यांना विनंती करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित निकाली काढावे .अशा मागणीचे निवेदन सादर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी महेंद्र करकडे , मिलिंद हेडाऊ, विपिन भालेराव, संजय मारकवार ,अविनाश वरघंटीवार ,दादाजी येरणे , अन्वर शेख, विनोद सिडाम ,संतोष चिताडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments