Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सरकारी जागेवरील निवासाची घरे हटविण्याचे विरोधात नोटिसांची होळी, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात आक्रोश

सरकारी जागेवरील निवासाची घरे हटविण्याचे विरोधात नोटिसांची होळी,
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात आक्रोश

मूल प्रतिनिधी

अनेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने धास्तावलेल्या अतिक्रमनधारकांनी तहसिल कार्यालयात दिवसभर निवेदने देत नोटीसची होळी केली.

सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार सावली यांचेकडून सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली असून २२ नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यामुळे अतिक्रमनधारक धास्तावले आहेत. सदर जमिनीवर पक्के घरे बांधकाम झालेले आहे, त्याच जागेवर शासनाकडून आवास योजनेची घरकुल बांधकाम झालेले आहे, त्याच वस्तीत शासकीय योजनेतून रस्ते, नाली व शासकीय इमारतीचे बांधकाम झालेले आहेत मात्र नुकतेच तहसिलदार सावली यांनी नोटीस पाठविल्याने अतिक्रमनधारकांवर बेघर होण्याची पाळी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवू नये असे निवेदन देत तहसिल कार्यालयासमोर नोटिसची होळी केली.

Post a Comment

0 Comments