Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल मध्ये भुरट्या चोरांच्या सुळसुळाट, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी

#मूल मध्ये भुरट्या चोरांच्या (thief )सुळसुळाट, #पोलिसांची (Police) गस्त वाढवण्याची मागणी

मूल प्रतिनिधी

मूल शहरात भुरट्या चोरांनी चांगला धुमाकूळ घातला असून तहसील कार्यालय परिसरात अनेक दुकान फोडून नगदी रोख रक्कम लंपास केली.
तहसील कार्यालय परीसरात अनेक किरकोळ व्यावसायीक व्यवसाय करून आपला आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीत आहे. ऑनलाईन जाॅब वर्क आणि झेराॅक्सचे बहुतांश दुकानं असुन गरीब बेरोजगार तरूणांचे जगण्याचे आधार आहे. मागील आठवड्यात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. येथील अनेक दुकानांचे कुलुप तोडून त्यातील नगदी रोख रक्कम लंपास केली. तहसील कार्यालया समोरील GK मोबाईल,पत्रकार भवना शेजारील एलआयसी (LIC) प्रीमियम पाॅईंट,तुकाराम चाय टपरी यांचे कुलपं तोडुन त्यातील रोख रक्कम चोरून नेली. घटनेची माहिती मूल पोलीस ठाण्यात दिली असुन या परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments