Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघ दिसला रे वाघ....! रोजच वाघ्रदर्शन; बंदोबस्त करण्याची मागणी

वाघ दिसला रे वाघ....! रोजच वाघ्रदर्शन; बंदोबस्त करण्याची मागणी

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांचा जिल्हा अशी आहे. ताडोबा वाघ्रप्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. जंगलात दिसणाऱ्या वाघाने आता गाववेशीवर धडक दिली आहे. मुल तालुक्यातील अनेक गाव-खेड्यात वाघाचे दर्शन होत असतानाच आता मूल शहरालगत असलेल्या कर्मवीर मैदानाला लागून टेकडी आहे. त्या परिसरात मूल शहरातील नागरिक सकाळी (मॉर्निंग वाकला) फिरायला आणि व्यायाम करायला जात असतात. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वाघाला पाहिले. सध्या वाघाने जनावरांना लक्ष केल्या असले तरी मानवी जीवनावर तो हल्ले करू शकतो. 

विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर ला  सकाळी फिरायला गेलेल्या प्रवीण मराठे या इसमाला वाघाचे दर्शन झाले असावे आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केल्याची चर्चा करण्यात आली होती.

त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी फिरायला जाणारे आणि मूलचे नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments