Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही - फडणवीस

कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही - फडणवीस 

मूल प्रतिनिधी

मूल येथिल फडणविस वाडा येथे तारीख 16 बुधवारला मूल, सावली, पोंभुर्णा व चंद्रपुर ग्रामीण कार्यकंर्त्यांची बैठक माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 
       चंद्रपुर जिल्हातील जंगली प्राण्यांची दहशत, शेतातील पिकांची रानडुक्करांन कडून नुकसान, वनजमीनी वरिल अतिक्रमण धारकांचा प्रश्न, बेघर वस्तीच्या घंराच्या प्लाॅटचे स्थायी पट्टे, मच्छीमार बांधवांच्या समश्या, जलसिंचनाचे प्रश्न, अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकरांचे प्रश्न, घरकुल इत्यादी समस्या आलेले कार्यकर्त्यांनी सांगीतले व निवेदन दिले. याच बरोबर कार्यकर्त्यांची तहसील कार्यालय, पंचायत समिती, दवाखाने, पोलीस स्टेशन, व ईतर कार्यालयात काम होत नाही. कार्यकर्त्यांना कोणीही महत्व देत नाही. समस्यांची कोणीही दखल घेत नाही. अशी उपस्थितांपैकी बहुतेकांनी खंत व्यक्त केली. व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे  प्रश्न सोडविण्यासाठी व मान, सन्मान वाढविण्यासाठी,आदरणीय शोभाताईंनी पाठीशी उभे व्हावे. कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहिल असा विश्वास सर्वांनी दिला.
    या बैठकीस जवळपास ७०० कार्यकर्त्यां पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. यात युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. 
      या बैठकीत प्रस्ताविक मुल तालुका माजी अध्यक्ष अविनाश जगताप संचालन महेंद्र करकाडे,व आभार विजय पाकमोडे यांनी केले .यावेळी जेष्ठ नेते ओमदेव पाटील मंगर, भालचंद्र बोदलकर, तुळशीराम कुंभारे संतोषभाऊ तंगडपल्लीवार ,माजी न्यायमूर्ती मेश्राम साहेब ,गजानन वलकेवार  यांनी  समयोचित मार्गदर्शन केले . देवरावभाऊ मुद्दमवार, दौलत भोपये, अजय लोणारे, अभिजित मंगळगिरीवार,  चंद्रकांत गांगरेड्डीवार, लोकनाथ नर्मलवार, अनिल संतोषवार, विपीन भालेराव, संजय मारकवार, आकाश पाटील, सुरेश अहिरकर,  दादाजी येरणे, विनोद सिडाम, भगवान ढोरे, गुड्डु हेडावू, सतिश आकुलवार, अविनाश वरगंटीवार, साहील येनगंटिवार जितु टिंगुसले ,सुरज मांदाडे,  विजय चिलके यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments