Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कांतापेठ येथे समुपदेशन व पथनाट्याव्दारे जनजागृती कार्यक्रम

कांतापेठ येथे समुपदेशन व पथनाट्याव्दारे जनजागृती कार्यक्रम

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यांतील कांतापेठ येथे समाज प्रबोधनातून जनजागृती अभियाना अंतर्गत १२ नोव्हेंबर २०१२ ला कार्यक्रम घेयात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी तथा समुपदेशक दुर्गाप्रसाद बनकर (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, लाईफ कोच), सोनाली बनकर (सॉफ्ट स्किल ट्रेनर),  गोपाल कोकणे (असिस्टेट सायकॉलाजिस्ट) यांनी गावातिल सर्व युवा वर्गाला प्रोत्साहीत करून त्याच्या मनात नविन ध्येय निर्माण करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले. तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून गावातील नवनिर्वाचित सरपंच वैशाली निकोडे, तसेच शिक्षण समिती अध्यक्ष श्रीकृष्ण गद्देकार, वन समिती अध्यक्ष महेंद्रजी वाढई, तंटामुक्ती अध्यक्ष जायकर या पठाण, पोलिस पाटील संगिता चल्लावार,  ग्रामसेवक गिरसावळे यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या कार्यक्रमाला आगळीवेगळी रंगत माती मित्र चमू कांतापेठ यानी पथनाट्य सादर करून तरुणांना प्रोत्साहीत केले.
तसेच प्रोजेक्टर द्वारे प्रेरक चलचित्रे दाखवण्यात आले. तसेच  दुर्गाप्रसाद बनकर यांच्याकडून स्वः मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निखिल गद्देकार यांनी केले. तसेच या कार्यक्रमाची प्रस्तावना उद्धवजी मोढाडे माजी गट विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राकेश भोयर यांनी केले. या कार्यक्रमाला संपुर्ण कांतापेठ वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments