Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

मूल येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

मूल प्रतिनिधी

शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन आणि क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती पर्वचे औचित्य साधून आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 2022 व राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन मुल येथील मा.सा.कन्नमवार सभागृहात दिनांक 20 नोव्हेंबर रविवारला करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदोलाकार तथा आदिवासी साहित्यिक प्रा. वसंतराव कन्नाके यांच्या हस्ते होणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाज प्रबोधनकार सुवर्णा वरखेडे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन एडवोकेट लालसू नागोटी, कोलाम समाजाचे अध्यक्ष राहुल आत्राम, आदिवासी हलबा हलवी राज्य कर्मचारी महासंघ नागपूरचे सचिव मिलिंद कुरसुंगे, आदिवासी वारली महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयराम सहारे, तडवी भिल्ल समाज महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष रशीद तडवी आदी विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी आदिवासींच्या बोलीभाषा, नृत्य, पारंपरिक वाद्य, सादरीकरण, चित्रप्रदर्शन आणि समाजभूषनांचा सत्कार आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाचा मोठया सख्येने समाजबांधवानी उपस्थीत राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आव्हाहन आयोजन समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments