Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पुरोगामी संघटनेकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट,पुरोगामी म्हणजे विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना - श्रीनिवास कांबळे

पुरोगामी संघटनेकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट,पुरोगामी म्हणजे विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना - श्रीनिवास कांबळे

मूल प्रतिनिधी
 
                 महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे ञैवार्षिक अधिवेशन व सत्कार सोहळा
 शिवसाई  मंदिर,माउंट काॕन्व्हेंट रोड,गोपाल नगर,चंद्रपूर येथे
उदघाटक निवास कांबळे गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर व
किशोर आनंदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले . यावेळी संघटनेच्या वतीने नारायण कांबळे ,जिल्हा नेता व
मन्साराम आञाम ,विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचा मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
   संघटनात्मक दिशा देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून विजय भोगेकर राज्यनेते ,हरिश ससनकर राज्य सरचिटणीस ,संजय चिडे ,जिल्हा सरचिटणीस,निखील तांबोळी  
दिपकभाऊ वर्हेकर सर ,जिल्हा सल्लागार ,शालिनी खटी  महिला मंच अध्यक्ष,
पोर्णिमा मेहरकुरे , सरचिटणीस व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती .
               पुरोगामी संघटनेच्या सामाजिक परंपरेला अनुसरून गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना पुरोगामी समितीच्या वतीने नवोदय परीक्षा व स्काॕलरशीप परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शिका व चेस बोर्ड भेट देण्यात आले. त्याप्रसंगी पुरोगामी ही विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना असून न्याय हक्कासाठी भांडता भांडता सामाजिक मूल्य जोपासत असल्याचे मत निवास कांबळे यांनी व्यक्त केले .
               त्रैवार्षिक अधिवेशन व सत्कार सोहळ्यानंतर जिल्हा कार्यकारीणीद्वारा २०२२-२५ करिता नुतन कार्यकारीनीचे गठण करण्यात आले.तालुका नेते देवेंद्र गिरडकर ,अध्यक्ष गणेश कागदेलवार ,सरचिटणीस प्रकाश झाडे  ,कार्याध्यक्ष शाम पाचघरे सर ,कोषाध्यक्ष संतोष शुक्ला यांची एकमताने निवड करण्यात आली .
        महिला मंच कार्यकारिणीत
अध्यक्ष सुरेखा वांढरे सरचिटणीस मंजुषा फुलझेले कार्याध्यक्ष वंदना वाटेकर कोषाध्यक्ष मदनकर यांची एकमताने निवड करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .
             कार्यक्रमाचे संचालन प्रकाश झाडे , प्रास्ताविक प्रतिभा उदापुरे तर आभार प्रशांत कावळे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments