Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गांगलवाडी येथील आर ओ प्लांट एक वर्षापासून बंद, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गांगलवाडी येथील आर ओ प्लांट एक वर्षापासून बंद,
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

मूल प्रतिनिधी

ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही हे हेरून येथील मूल तालुक्यातील गांगलवाडी ग्रामपंचायतीने लाखों रुपये खर्च करून आर ओ प्लांट तयार करण्यात आला. नव दिवस नवलाईचे या उक्तप्रमाणे काही दिवस जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले. माञ काही तांत्रिक अडचणीमुळे आर ओ प्लांट मध्ये बिघाड आला. माञ ग्रामपंचायतीने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून लाखो रुपये खर्च करून तयार केलेला प्लांट धुळ खात आहे. त्यामुळे जनतेनी रोष व्यक्त केला आहे.

अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. गाव विकासासाठी  शासनाने ग्रामपंचायतीला  निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आर ओ प्लांट तयार करण्याचा निर्णय घेतला.जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्लांट मुळे शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे जनता खुश झाली होती. माञ काही महिन्यांतच या प्लांट मध्ये बिघाड झाला. त्यामुळे आर. ओ. प्लांट दुरुस्त करण्याची मागणी जनतेनी अनेकदा सरपंच व ग्रामसेवक यांचे कडे केली माञ कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून आर ओ प्लांट बंद आहे. लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्लांटचा काय उपयोग असा प्रश्न जनता ग्राम पंचायत प्रशासनाला करीत आहेत.

Post a Comment

0 Comments