Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मी आयएएस अधिकारी होणारच, सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

मी आयएएस अधिकारी होणारच, सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

मूल प्रतिनिधी

मी आय ए एस अधिकारी होणारच या उपक्रमअंतर्गत वाचन प्रेरणा दिनाचे अवचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेडी येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत खेडी च्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन गावस्तरावर करण्यात आले.स्पर्धा परीक्षेचे वातावरण गावात निर्माण व्हावे या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणि त्याचे बक्षीस वितरण सुनीता मरस्कोल्हे, सावलीचे संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोले, ठाणेदार बोरकर  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार,  खेडीचे सरपंच सचिन काटपल्लिवार, उपसरपंच सौ.गरतुलवार, अनिल माचेवार,अध्यक्ष शा. व्य.स.खेडी सौ पुटकमवार तसेच  शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्राम पंचायत  येथील सर्व सभासद आणि गावातील सर्व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी अक्षय मर्लावार आणि कुमारी ऋतुजा कोरेवार यांनी मनोगत व्यक्त केले. पदवीधर या गटातून
तिरुपती मर्लावार, अक्षय मर्लावार, कार्तिक गर्कावार 9ते 12 या गटातून वेदांत म्याणावार,पियूष दुधे,ऋतुजा कोरेवार आणि 5ते8 या गटातून कु.मानसी कोरेवार, कू.वैष्णवी अन्नावार, कू.आचल राऊत,अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नवनीत कंदालवार, नंदकिशोर नंदनवार, कू.सुमित्रा कुमरे , सुमित देवगडे,श्री.उराडे स.शि.तसेच प्रतीक तुंगिडवार शिक्षणप्रेमी खेडी श्री.विपीन वाकडे ग्रामसेवक तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन रतन आणि प्रांजली दंडावार यांनी केले तर आभार सुमित देवगडे यांनी मानले. प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रुपात एमपीएससी स्तरावरील पुस्तके आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. बक्षीसा करिता गावातील सामाजिक संघटना पुढे आल्या.

Post a Comment

0 Comments