Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा

मूल प्रतिनिधी

मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व  तालुका समन्वयक कु.निकिता ठेंगणे यांच्या नियंत्रणात जि. प. उच्च. प्राथ. शाळा डोंगरगाव,मरेगाव, चीतेगावं, चीमढा, भवराळा, बाबराळा,विरई, बोंडाळा बुज.  गडीसुर्ला येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. 

दर वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा 11 ऑक्टोंबर ला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे मुलींना सक्षम बनविणे , त्यांच्या आवाजांना प्रोत्साहन देणे , किशोरवयीन मुलींची क्षमता आणि कौशल्य ओडखून त्यांच्या साठी अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच बालविवाह , शिकण्याच्या कमी संधी,हिंसा,आणि भेदभाव ,यासह जगभरातील लहान मुलींना तोंड द्यावे लागणारे लिंगाधारीत आव्हाने दूर करण्यासाठी हा दिवस नियुक्त केला जातो .दर वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस थीम नुसार साजरा केला जातो . या वर्षी 2022 ची थीम *आता आमची वेळ आहे - आमचे हक्क* ही आहे.
 

बालिका दिवस साजरा करण्यासाठी गावामधे भव्य रॅली, काढण्यात आले. वेगवेगळे गेम, ॲक्टिविटी घेण्यात आले. त्यात दोरिवरच्या उड्या, पोट्याटो रेस, पोस्टर मेकिंग, यासारखे ॲक्टिविटी घेण्यात आले. यानंतर विजेत्यां मुलींना स्वच्छ्ता किट  बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित  जि. प. उच्च. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, शिक्षवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पोलीस पाटील पालकवर्ग  होते. मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी दिनेश कामतवार,शुभांगी रामगोनवार समूदाय समन्वयक आम्रपाली अलोने,शेवंता सोनुले,उर्मिला बावणे,जितेंद्र गोंधळी,धीरज गोहने,अश्विनी वाढई, प्रद्या बोरकुटे, आचल आंबटकर यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार  पाडला.

Post a Comment

0 Comments