Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कराटे अँड फिटनेस क्लब मूलचे प्रशिक्षक राष्ट्रीय कराटे पंच परीक्षा उत्तीर्ण

कराटे अँड फिटनेस क्लब मूलचे प्रशिक्षक राष्ट्रीय कराटे पंच परीक्षा उत्तीर्ण

मूल प्रतिनिधी

जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे रेफरी, जज सेमिनार आणि परीक्षा रविवार 23 ऑक्टोबर रोजी 'फिट टू फाईट मार्शल आर्ट अकादमी,चंद्रपूर' येथे असोसिएशन चे इंडिया चीफ सेन्सेई विनय बोढे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. सदर सेमिनार आणि परिक्षेमधे 'तालुका कराटे-डो असोसिएशन मूल' संलग्नित 'कराटे अँड फिटनेस क्लब मूल' च्या प्रशिक्षक वर्गाने सहभाग घेत ही परीक्षा या ही वर्षी यशस्वी रित्या उत्तीर्ण केली. ज्यात मुख्य प्रशिक्षक इम्रान खान, निलेश गेडाम आणि सहप्रशिक्षक अमान खान, साक्षी गुरनुले, सुमेध पेंदोर,प्रतीक म्हाशाखेत्री यांचा समावेश होता.
दरवर्षी हे सेमिनार कराटे खेळात 'वर्ल्ड कराटे फेडरेशन' (WKF) द्वारा झालेले बदल जाणून प्रशिक्षक आणि पंच याना अद्यावत करण्याकरिता थेअरी आणि प्रॅक्टिकल स्वरूपात असोसिएशन तर्फे घेतले जातात.सेमिनार आणि परीक्षा उत्तम रित्या पार पाडून योग्य मार्गर्शन करण्याकरिता इंडिया चीफ सेन्सेई विनय बोढे, सेन्सेई रवी मुक्के सर आणि सेन्सेई मूहाफीज सिद्दीकी यांचे विशेष योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments