Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थी हा विचारांचा वाटसरू असतो - डॉ.अनमोल शेंडे

विद्यार्थी हा विचारांचा वाटसरू असतो - डॉ.अनमोल शेंडे 

मूल प्रतिनिधी
 

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल जि.चद्रपूर येथे प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात मराठी भाषा व ऐच्छिक मराठी या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी विषय तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले . या व्याख्यानाला    गो़विंदराव वारजूरकर महाविद्यालय नागभिड येथिल मराठी विभाग प्रमुख डॉ.अनमोल शेंडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनात साहित्य व जीवनमूल्ये या विषयावर आधारित अभ्यासक्रमातील लेख, कवितांच्या रचनेमागील वास्तव, त्यातील सामाजिक जाणीवा स्पष्ट करतांना विद्यार्थी हा विचारांचा वाटसरू असतो असे मत सरांनी मांडले.मराठी भाषेच्या अभ्यासातुन विद्यार्थ्यांमध्ये अनेक भाषिक कौशल्य विकसित होतात.साहित्य निर्मिती ची आवड निर्माण होते, साहित्यातून विद्यार्थांवर संस्कार होतात. समाजातील अनेक ज्वलंत समस्यांवर वाचा फुटते ,अशी मौलिक  मार्गदर्शन सरांनी केले.जे विद्यार्थ्यांसाठी फार मोलाचे होते.

मराठी विभागाच्या वतीने आयोजित या व्याख्यानाला ३०० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यकमाचे संचालन कु .शिणानी कांबडी हिने केले ,तर आभार कु.दामिनी मोहुरले हिने केले. विद्यार्थीची भाषा व साहित्या बदलची मते विस्तारित  व्हावी ,या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन केले गेले.

Post a Comment

0 Comments