मूल शहरात "माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत" अभियान, आरोग्य विषयक तपासणी व मार्गदर्शन
माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत हे अभियान प्रथम 26 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर आणि दिनांक 10 ऑक्टोंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू असून मुल शहरात उपजिल्हा रुग्णालय मुल चे आर बी एस के वैद्यकीय अधिकारी डॉ तीरथ उराडे , डॉ प्रियंका मस्के, फार्मसिस्ट कुमारी दीपमाला बाला, ए एन एम कुमारी आशा नीखाडे, एन सी डी समुपदेशक कुमारी ममता शेंडे, एन सी डी स्टाफ नर्स कुमारी विजया शिवणकर व हिंद लॅबची तंत्रज्ञ कुमारी निशा या चमूने अंगणवाडीतील बालकांच्या तपासणी नंतर 18 वर्ष वरील महिलांची ,गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करीत असून महिलांना पोषण आहार तसेच रक्तक्षय , मधुमेह, उच्च रक्तदाब, सिकलसेल, थायराईड, मुखाचा कर्क रोग, स्तनाचा कर्क रोग, गर्भाशयाचा कर्क रोग, इत्यादी आजारा बाबत तपासणी करण्यात येत आहे. तसेच पोषण आहाराबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. महाविद्यायातील 18 वर्षा वरील मुलींची तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक मार्गर्शन करण्यात येत आहे. हे अभियान 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू असून या अभियानाचा लाभ घेऊन मुल शहरातील 18 वर्ष वयोगटातील महिलांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आव्हान आर बी एस के वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमू मार्फत उप जिल्हा रुग्णालय मुल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ सोनारकर यांनी केले आहे.
0 Comments