Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जागतिक विद्यार्थी दिवस व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

जागतिक विद्यार्थी दिवस व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न 

मूल प्रतिनिधी
 

नवभारत विद्यालय मूल येथे विद्यार्थी दिवस व भारतरतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री झाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रमुख अतिथी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका  श्रीमती राजमलवार मॅडम यांनी दिपप्रज्वलन केले. मुख्याध्यापक श्री झाडे सरांनी भारतरत्न डॉ एक.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला  माला अर्पण केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. श्री.बोडे सरांनी व कु.उमक मॅडमने अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अतिशय मोलाची माहिती दिली.

त्यानंतर वाचनप्रेरणा दिन म्हणून सर्वांनी सामूहिक वाचन केले. विद्यार्थी दिन विद्यार्थी म्हणजे सदैव जाणून घेणारा विद म्हणजे जाणने व अर्थी म्हणजे इच्छा असलेला अशा विद्यार्थ्यांना  सौ.भांडारकर मॅडमनी पुस्तक व जांभूळ रोप भेट दिली.
शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री झाडे सरांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थांनी भरपूर वाचन करुन ज्ञानमय व्हावे असा संदेश दिला.
 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.माथनकर सरांनी केले अतिशय प्रसन्न वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका,सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments