Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूलची कु. प्रणाली गावतुरेचे सुयश, दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी, नागपुरात लागले होर्डिंग

मूलची कु. प्रणाली गावतुरेचे सुयश, दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी, नागपुरात लागले होर्डिंग

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील रहिवासी असलेली सध्या दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नागपूर ची विद्यार्थिनी कुमारी प्रणाली कविता अनिल गावतुरे ही बी.ए.एम.एस तृतीय वर्षात 70.76 गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केली आहे. महाविद्यालयाने नागपुरात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे रँक घेतलेल्या विद्यार्थ्यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. प्रणाली ही प्रथम क्रमांक मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहे. तिच्या यशाने घरच्या सदस्यांनी, नातेाइकांकडून,मित्र मैत्रिणी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

प्रणाली चे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मूल च्या सेंट अन्स हायस्कूल शाळेत झाले.  येथे शिक्षण घेत असताना ती अभ्यासासह क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमातही पुढे असायची. प्रणाली ला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असुन घरीही शैक्षणिक वातावरण आहे. वडील शिक्षक होते. आई कविता गावतूरे ह्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका आहेत. तर भाऊ निलय गावतुरे हा कंप्यूटर इंजिनियर असून एका नामांकित कंपनीत नोकरी करीत आहे.


वडील हयात नसले तरी मुलगी डॉक्टर बनावे असे स्वप्न होते. तेच स्वप्न प्रणाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असून वडिलांचे स्वप्न हेच माझे स्वप्न असल्याचे आणि भविष्यात स्त्री रोग तज्ञ बनायचे असल्याचे मूल Live शी बोलताना व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments