Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

समाजाला सेवा प्रदान करणे आमचे मूलभूत कर्तव्य -सचिन चिंतावार, मूल येथे जागतिक फार्मासिस्ट दिवस संपन्न

समाजाला सेवा प्रदान करणे आमचे मूलभूत कर्तव्य -सचिन चिंतावार, मूल येथे जागतिक फार्मासिस्ट दिवस संपन्न

मूल प्रतिनिधी

25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येते. चंद्रपूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन चंद्रपूरच्या माध्यमातून मुल शाखेतर्फे फार्मासिस्ट दिन मूल शहरात साजरा करण्यात आला. या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य निगडित विविध समस्या आहेत, समाजाला आरोग्य निशी सेवा प्रदान करणे त्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे, डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून समाजाला सेवा देणे हा आमचा मूलभूत कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जागतिक फार्मासिस दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन चिंतावार यांनी बोलताना व्यक्त केले.

मूल शहरात आज संघटनेतर्फे शहरातील सर्व फार्मासिस्ट गांधी चौकात एकत्र येत नारेबाजी करून जनतेचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष किशोर गोगुलवार  जयंत दांडेकर,नितीन राजा, संजय चिंतावार, मनीष येलट्टीवार, उमेश चेपूरवार, मोनी राजा, सुरेश सुरकर, गजानन टोंगे, नितीन राईनचवार, अशोक गंधेवार, विनोद दांडेकर, अन्वय चिंतावार प्रणित मुत्तेलवार तथा  समस्त केमिस्ट बांधव प्रामुख्याने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments