Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

देश सेवेनंतर परत आलेल्या जवानाचा जंगी स्वागत, जयघोषाने मूल नगरी दुमदुमली

देश सेवेनंतर परत आलेल्या जवानाचा जंगी स्वागत, जयघोषाने मूल नगरी दुमदुमली 

मूल प्रतिनिधी

मूल येथील दरार गणेश मंडळाचे सदस्य खालीद यासिन शेख हे आपली बी एस एफ मधील सेवा बजावून मुल येथे परतल्यानंतर दरार गणेश मंडळ आणि मित्र परिवारांनी खलिद शेख यांचे शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.

खालीद शेख यांचे आगमन होताच, गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर दरार क्रिकेट मंडळाचे सभासद उपस्थित नागरिक मिरवणुकीत देशभक्तिपर गाण्यासह खालीद शेख यांना महात्मा फुले चौकात आणून येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील नागरिक, गणमान्य व्यक्तीं स्वागत करत होते. भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी दरार गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत समर्थ, मूलचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत, नंदू रणदिवे, महेंद्र कडकाडे, सुरेश फुलझेले,विनोद सिडाम, किशोर कापगते, दिलीप सुचक वॉर्डातील नागरिक , आणि दरार दुर्गा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments