Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पोषण महाअभियान अंतर्गत मूल तालुक्यात कुपोषण मुक्तीकडे वाटचाल

पोषण महाअभियान अंतर्गत मूल तालुक्यात कुपोषण मुक्तीकडे वाटचाल

मूल प्रतिनिधी

कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, अंगणवाडीच्या माध्यमातून समाजात आहार, आरोग्य व स्वच्छता हा संदेश घरोघरी पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन पोषण महा अभियान राबवित आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे उचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मूलंतर्गत भेजगाव सर्कलमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महाविद्याण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येसगाव येथील अंगणवाडी केंद्रात सदर उपक्रमाचे उद्घाटन समुदाय आरोग्य अधिकारी कल्याणी पाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका शैला आवळे, यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत एक ते तीस सप्टेंबर हा महिना पोषण महा अभियान म्हणून शासन राबवत असून यात महिला व त्यांचे आरोग्य, कुपोषण, शिक्षण तसेच गरोदर, स्तनदा माता आणि मुले यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि आहार, स्वच्छता, लसीकरण यामुळे आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले.

यावेळी आहार प्रदर्शनात गरोदर मातेला आपली व होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यावी याचे आहार प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक पर्यवेक्षिका शैला आवळे तर कार्यक्रमाचे संचालन मालता वाढई तर आभार शितल वाढई हिने माणले यावेळी अंगणवाडी सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments