Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बाल विवाह प्रतीबंधक जनजागृती अभियानात जनतेनी सहभागी व्हावे - हरिश्चंद्र पाल यांचे आवाहन

बाल विवाह प्रतीबंधक जनजागृती अभियानात जनतेनी सहभागी व्हावे, नागभिड येथील जिल्हा बाल कल्याण समीतीच्या बैठकीत हरीशचंद्र पाल यांचे आवाहन    

प्रतिनिधी


बाल कल्याण समिती जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हा महीला व बालकल्याण विभाग च्या वतीने पंचायत समिती सभागृहात नागभि ड जिल्हा चंद्रपूर* येथे जिल्ह्यातील *कोरोणा साथीत वैधव्य प्राप्त झालेल्या महीला, कुमारी माता, व एकल महिलांच्या मुलामुलींसाठी बालसंगोपन योजनेचा लाभ* देण्यासाठी मान्यता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील *ब्रम्हपुरी, नागभिड, व सिंदेवाही तालुक्यातील १०० हून अधिक एकल महिलांची* उपस्थिती होती.   ग्रामीण भागातील गरीब व गरजू  लोकांना  जिल्ह्याचे ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी होणारा त्रास व पडणारा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी या बैठकीचे आयोजन तालूका स्तरावर करण्यात आले होते.       या बैठकीत *चंद्रपूर जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्षा ऍड.क्षमा बासरकर सदस्या सर्वश्री ऍड. अमृता वाघ, वनिता घुमे, डॉ.ज्योत्स्ना मोहीतकर, ऍड.वसूधा भोंगळे*, यांनी बालसंगोपन योजना सत्र २०२२-२३ करीता लाभार्थींना मान्यता देण्याची प्रक्रिया पुर्ण केली, याकरीता *चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशिका कु. प्रिया पिंपळशेंडे,          समाजकार्य कर्त्या कु.प्रतिभा मडावी, डाटा एन्ट्री ऑपरेटर अजय कवाडे* यांनी बालकल्याण समीतीला सहकार्य केले.                                या बैठकीत सहभागी *एकल महीला पालक आणि त्यांच्या मुलामुलींना बालविवाह एक अनिष्ट प्रथा, वयात आलेल्या मुलींसोबत आईनी कसे वागावे, आपली मुलगी अनोळखी व्यक्ती सोबत राहत असेल किंवा घरापासून दूर राहत असेल तर पालकांचे कर्तव्य, मासिक पाळी व घ्यावयाची काळजी किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण,अल्पवयीन मातेचे वाढते प्रमाण व पॉक्सो कायदा यावर चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशिका कु.प्रिया पिंपळशेंडे* तसेच *बाल कल्याण समिति च्या अध्यक्ष ॲड क्षमा बासरकर मॅडम* ह्यांनी मार्गदर्शन केले तर *बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चे महत्व, बालविवाहाची कारणे, उपाययोजना, बालविवाहास जबाबदार व उपस्थित व्यक्तींवर होणारी कारवाई यावर स्व रुख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा चे सचिव श्री हरीश्चंद्र पाल* यांनी माहीती दिली, आणि *१० ऑक्टोबर २०२२ रोजी  संपूर्ण भारतभर कैलास सत्यार्थी फाऊंडेशन द्वारा आयोजित दिपरैली आयोजित केली आहे, स्व.रुख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा द्वारा चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियान दिपरैलीचे आयोजन करण्यात येणार आहे, या रैलीत बालसंगोपन योजनेचा लाभ घेणा-या व इतर ही शासकीय योजनेचा लाभ घेणा-या महीलांनी सहभागी व्हावे व बालविवाह ही कुप्रथा नष्ट करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्यास एकल महीलांनी पुढे यावे असे आवाहन हरीश्चंद्र पाल यांनी केले आहे.*                                    यावेळी *संस्थाचालक पुरुषोत्तम चौधरी, बढोले,स्व रुख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा चन्नोडे, स्वामी विवेकानंद बालगृहाचे हेमंत शिंपी, यांची उपस्थिती होती*

Post a Comment

0 Comments