Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लवकरच शिक्षणमंत्र्यासोबत संघटनेची बैठक लावणार : ना. सुधीर मुनगंटीवार

लवकरच शिक्षणमंत्र्यासोबत संघटनेची बैठक लावणार : ना. सुधीर मुनगंटीवार
----------------------------------------
पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाची नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
-------------------------------------------

मूल प्रतिनिधी
 
प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन चंद्रपूर येथे विद्यमान नामदार सुधीर मुनगंटीवार मंत्री सांस्कृतिक व वने महाराष्ट्र यांची पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे वतीने  निवेदन देऊन   चर्चा करण्यात आली .यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना मानवस्त्र व पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .    राज्यस्तरीय समस्या   केवळ निवेदन निवेदन देऊन सुटणार नाहीत ,याकरिता मंत्री महोदयांनी  आमचे शिक्षण खात्याचे मंत्री दीपक केसरकर साहेब यांचे सोबत मुंबई येथे बैठक लावावी अशी विनंती शिष्टमंडळाचे वतीने करण्यात आली .
   १० ऑक्टोबर नंतर शिक्षणमंत्री महोदयांसोबत बैठक लावतो असे नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले . मंत्री महोदया सोबतची बैठक पूर्व नियोजित असून , भेट आणि चर्चा करण्याकरिता सुधीरभाऊंनी अर्धा तास पुरोगामी शिक्षक संघटनेसाठी राखून ठेवला होता हे विशेष .याकरिता जिल्हा शाखेचे सचिव श्री सुरेश गीलोरकर यांनी नियोजन केले होते .
        याप्रसंगी जिवती येथून शिक्षकांचे एक शिष्टमंडळ दुर्गम भागातील जागा प्रथम भराव्यात नंतर साधारण क्षेत्रातील अशा प्रकारचे निवेदन मंत्री महोदयांना देण्याकरिता आले होते . नुकतेच करण्यात आलेली पदस्थापना कशी चुकीची आहे हे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून देण्यात आले . सुधीरभाऊंनी याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कडे संघटनेची सभा लावून  त्यावर तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिले.
             चंद्रपूर जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी केलेल्या आंदोलनाची सुधीरभाऊनी दखल घेतली असून त्याविषयी सुद्धा लवकरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात येतील असे आश्वासन सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री महोदय यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले .उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया त्वरित करायला लावू , याशिवाय केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे शासन स्तरावरून नियोजनपूर्वक भरण्याचे पत्र दिलेले आहे त्यानुसार पदोन्नती देण्यात येईल. अवघड क्षेत्रातील 2018 ची आणि 2021-22 मध्ये तयार करण्यात आलेली गावांची यादी बदल्यापूर्वी अपलोड करण्यात येईल , यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले .
    सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री महोदयांना करण्यात आली ; याकरता मुंबई येथे चर्चा करू असे मंत्री महोदय म्हणाले .
               भेटीदरम्यान पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळात राज्यनेते विजय भोगेकर, जिल्हानेते दीपक वऱ्हेकर, कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे, उपाध्यक्ष रवी सोयाम, संघटक नोमाजी झाडे, सचिव सुरेश गिलोरकर, मार्गदर्शक विजय हरमवार,जिवती येथून भाऊराव बोन्डे, विजय रोडे, परसूटकर सर, कडुकर सर, आशा जोगी मॅडम, आडे मॅडम, मडावी मॅडम, मत्ते सर, पेंडके सर, राहुल गंधारे सर, आदी पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments