Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न

मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न

मूल प्रतिनिधी

5 सप्टेंबर 2022 रोजी मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी शिक्षक वर्गानी दैनंदिन परिपाठ सादर केला.  मुख्याध्यापक रवी कावळे सर यांनी विद्यार्थ्यांना समाजात शिक्षकांचे महत्व पटवुन दिले.
यानंतर 6 वि ते 10 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्ययनाचे कार्य केले. यानंतर 9 वि व 10 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनहुन शाळेचे मुख्याध्यापक रवी कावळे सर, असपाक सय्यद अकॅडमीक इंचार्जे उपस्थित होते.या मध्ये गीत खेळ शिक्षकांसाठी आयोजित केल्या गेलं होतं. अध्यक्षीय भाषणातुन रवी सर यांनी विद्यार्थ्या ना शिक्षक यांचे कठीण कार्य कसे देशा च भविष्य घडवितात ते सांगले.तर असपाक सरानी योग्य भविष्य घडवा तीच योग्य गुरुदक्षिणा शिक्षकांसाठी राहील हे सांगितले. कार्यक्रमाचं संचालन शर्वरी बोमनवर आणि प्रिया वाढई इयत्ता 10 वि तर श्रावणी खोब्रागडे इय्यता 10 वि हिने आभार प्रदशन केले.

Post a Comment

0 Comments