Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नागेंद्र नेवारे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

नागेंद्र नेवारे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
------------------------------------- ---

मूल प्रतिनिधी

झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी लिहित्या हातांना प्रोत्साहन देत असते . याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील साहित्यिक शिक्षकांना *झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार* देत असते .
               दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या मूल तालुक्यातील नागेंद्र नेवारे या साहित्यिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे .
          झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार निवड समितीने झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या नागेंद्र नेवारे यांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात माजी खासदार संजय धोटे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , प्रा. रत्नमाला भोयर , सिनेट सदस्य दिलीप चौधरी , अरुण झगडकर , लक्ष्मण खोब्रागडे या मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . नागेंद्र नेवारे हे मूल तालुक्यातील झाडीबोलीचे अभ्यासक असून त्यांचे दोन कवितासंग्रह व अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत . त्यांचा सामाजिक चळवळीतील सहभाग आणि साहित्यिक प्रवास यामुळे पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments