Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या वतीने पुरोगामी संघटनेकडून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा सत्कार.

अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या वतीने पुरोगामी संघटनेकडून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा सत्कार.
----------------------------------------
अवघडची दुसरी यादी अपलोड करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
---------------------------------------

मूल प्रतिनिधी

घुग्गुस येथील ना. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक  संघटनेच्याच्या  शिष्टमंडळाने संपूर्ण जिवती तालुका अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा मानवस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिष्टमंडळात पुरोगामी शिक्षक संघटनेचे सुरेश गीलोरकर, विपीन धाबेकर,  कविताताई जाधव, नोमाजी झाडे, राहुल गंधारे, विशाल कोटगीरवार, संभा गावंडे, दुशांत मत्ते, विजय सातपुते, खिरटकर सर, तातोबा भालेराव, सोमनाथ जाधव, सुनिल बोधे, निलकंठ मोरे, संतोष पावडे, रामरतन चापले उपस्थित होते.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी जिवती तालूका संपूर्णपणे अवघड क्षेत्र घोषित व्हावा यासाठी शिक्षकांच्या विविध शिष्टमंडळानी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदने दिली होती. त्या मागण्यांसंदर्भात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी  स्वतः पुढाकार घेऊन यशस्वी पाठपुरावा केला. त्याला यश आल्याने जिवती तालुक्यातील शिक्षकांना न्याय मिळाल्याच्या आनंदात अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या वतीने पुरोगामी संघटनेमार्फत देवरावभाऊ भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

शिष्टमंडळाच्या भेटीत यावर्षीच्या बदल्यांमध्येच नविन अवघड क्षेत्राचा लाभ शिक्षकांना मिळावा याकरीता दुसरी यादी अपलोड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली , तेव्हा तात्काळ जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली. सोबतच जिवती तालुक्यातील आठ शिक्षकांची नावे बदली पोर्टलवर बदलीस पात्र का नाहीत याबाबत माहिती घेऊन त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना ही दिल्या. याबाबत पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किशोर आनंदवार यांनी कार्यालयाला पत्र पाठविले असून शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे मान्य केले.

Post a Comment

0 Comments