Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालय मूल येथे शिक्षकदिन विविध उपक्रमांनी संपन्न

नवभारत विद्यालय मूल येथे शिक्षकदिन विविध उपक्रमांनी संपन्न

मूल प्रतिनिधी

5 संप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सर्व भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरी केल्या जाते.
आज नवभारत विद्यालय मूल येथे विविध उपक्रम राबवून शिक्षकदिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम  स्वयंशासन घेण्यात आले. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तम शिकवण्याचा प्रयत्न केला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री झाडे यांनी भुषविले.. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार यांनी आपलं स्थान भुषवलं... तसेच जेष्ठ शिक्षक श्री.चौधरी सर, श्री.डांगरे सर,श्री.मुंडरे सर,सौ.बांडगे मॅडम,भांडारकर मॅडम,कु.उमक,कु.तलांडे,कु.गोंगल मॅडम व सर्व शिक्षकांनी  आपलं स्नान भुषवलं.
सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व कांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. स्वागतगीत,विद्यार्थांची भाषने घेण्यात आली. 

अन्नपुर्णा दिन म्हणून विद्यालयाच्या वतीने शालेय पोषण आहार दररोज शिजवणाऱ्या ताईंचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री डांगरे सरांचा आज वाढदिवस  असल्याने त्यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सुंदर उपक्रम राबविला. यांत सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन व गीत सादर करुन मानाचा सन्मान दिला. शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळ घेऊन शिक्षकांना आनंदाची मेजवानीच विद्यार्थांनी दिली.
आनंदी वातावरणात विविधरंगी उपक्रमांनी शिक्षकदिन हा साजरा करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित  शाळेचे मुख्याध्यापक श्री. झाडे सर, पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते....
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली फाले व साक्षी मेश्राम ह्या विद्यार्थीनीने केले.तर नंदिनी वालदेने आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments