Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन मूल तर्फे जनजागृती रॅली व रक्तदान शिबिर संपन्न

संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन मूल तर्फे जनजागृती रॅली व रक्तदान शिबिर संपन्न 

मूल प्रतिनिधी
 

सद्गुरु माता सुदिक्षाजी सविंदर हरदेव सिंह महाराज यांच्या असीम कृपेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मूलद्वारा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक वडसा येथील किसनजी नागदेवते , कार्यक्रमाचे अध्यक्ष मुल मुखी लक्ष्मणजी निकुरे, प्रमुख अतिथी नांदगाव मुखी खुशालजी झोडगे, चामोर्शी मुखी अशोक बोरकुटे उपस्थित होते.

यावेळी मूल शहरात रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात सुंदर भवन येथून गांधी चौक, बस स्थानक, गुजरी चौक ते बाजार समिती परिसर आणि रॅलीची शेवट सत्संग भवन येथे करण्यात आले. यावेळी संत निरंकारी महाराज यांचा रक्त नाडीयो मे बहना चाहिए, नालीयो मे नही असा संदेश रॅलीतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला गडचिरोली रक्त संकलन टीमचे डॉक्टर नर्स व सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सेवा दल इन्चार्ज महेश रेड्डीवार, संतोष निकूरे गोविंद कटकेलवार, इंदिरा संदावार, भोजराज सिडाम, कवडू कोल्हे, मारुती भोयर, अर्चना लेनगुरे, वातरुजी नक्षुलवार, डॉक्टर नामदेव सोनुले आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments