Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून द्यावी -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली मागणी

शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून द्यावी -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली मागणी

प्रतिनिधी

पोंभुर्णा तालुक्यातील जन वन योजनेत समाविष्ट नसलेल्या गावातील शेतकऱ्याना झटका मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी वनमंत्री मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे मागणी करण्यात आली.

तालुक्यामधील ६२ पैकी फक्त ७ गावांचा समावेश डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेमध्ये आहे व त्या गावांतील शेतकऱ्याना झटका मशीनचा लाभ या योजनेंतर्गत मिळत आहे. परंतु ज्या गावांचा समावेश या योजनेमध्ये नाही, त्या गावातील शेतकऱ्याच्या शेत पिकांचे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. पोंभूर्णा तालुका हा जंगल व्याप्त आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याच्या शेत पिकांचे या प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे दरवर्षी शेतकरी आर्थिक संकटात येत असतो. शेतपिकाला संरक्षण मिळावं याकरिता जन वन योजने मध्ये समाविष्ट नसलेल्या गावांना पण झटका मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा ता महामंत्री तथा ग्रा. प माजी सरपंच आष्टा हरीश ढवस,भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा ग्रा प चकफुटाणा माजी सरपंच तुळशीराम रोहणकर,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय मस्के,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच फुटाणा नैलेश चिंचोलकर ग्रा.प नवेगाव मोरे माजी सरपंच रमाकांत पावडे यांनी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे.

Post a Comment

0 Comments